शनिवार, ९ एप्रिल, २०११

तुझ्या पावसाला सांग आज येणा माझ्या घरी
ओसाड हे घरदार आज येणा माझ्या दारी.

तप्त झाले माझे घर , तप्त झाली वीट वीट,
घरपण गेले त्याचे झाले आज वाळ्वंट,
तुझ्या पावसाला सांग येउनिया मज भेट..........

भिंतीला या भेग पडे होऊ लागे माती माती
माती माती किंकालाते रडू तिचे कानी येती
तुझ्या पावसाला सांग ओत, चिंब चिंब मोती................

तडा तडा वाजतात आज एक एक कौल
पडतात फुटतात कौल झाले माती मोल,
तुझ्या पावसाला सांग घरावर माझ्या डोल...........

अंगणात काय ताप कोमेजून गेली झाडे
सुकुनिया मुळ खोड एक एक पण गळे,
तुझ्या पावसाला सांग खाली ओत थेंब थोडे.............

घरापारी मन माझे झाले आज लाले लाल
पावसाचे मन तूझे त्याच्यासंगे भेट घाल
तुझ्या पावसाला सांग हृदयाची भाषा बोल.........

ब्रह्मदेव आतकरी
मी तसा हळव्या मनाचा आणि असा खूप नादान, खोडकर वगैरे वगैरे....
मला मैत्री करायला खूप आवडते, पण आजकाल लोकांना वेळच नाही,
ऑफिस चे काम, घराच्या कटकटी, घरासाठी दवाखान्यासाठी पैसा धावपळ...........
सगळे लोक त्रस्त झालेत. मी पण झालोय थोडासा त्रस्त ...... पण हसत असतो, खिदळत असतो.
आजकाल लोकांना सहज फोन केला आहे असे सांगितले आहे तर विश्वास बसत नाही......
पण लोकांना सहज फोन करणे माझी जुनीच सवय. उगाच भेटायला जायला मला खूप आवडायचे...........
आता कोणाकडे वेळ नसतो. मलाही वेळ मिळेनासा झाला आहे. जाऊदेत एक काम करा....
तुम्ही हसा ......................... जगाला हसवा बस्स!-------------------------------------------------- देवा महाराज सातारकर
जमेल तश्या कविता लिहित जाईन. वेळ काढून वाचा.